ज्ञानेश्वरी · अध्याय 1
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा
अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते
अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्थैव च
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेषां बलं भीमाभिरक्षितम्
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि
तस्य सनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्
ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः
पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनंजयः ।
पौंड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः
अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्चं सुघोष्मणिपुष्पकौ
काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः ।
दृष्टद्युम्नो विराटश्च सातकिश्चापराजितः
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वेशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक् पृथक्
स घोषो धार्त्रराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवींश्चैव तुमुलो व्यनुनादयन्
अथ व्यवस्थितान् दृष्टवा धार्तराष्ट्रानं कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः
यावदेतान् निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यस्मिन् रणसमुद्यमे
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागतः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकिर्षवः
झुंजाची आवडी धरती । परी संग्रामी वीर नव्हती ।
हे सांगेन रायाप्रती । काय संजयो म्हणे । १७३॥
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति
तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखींस्थता
श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान् समीक्ष स कौंतेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्
दृष्ट्वेनं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थिताम्
सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमाहर्षश्च जायते
गांडीवम् स्त्रंसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः
ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार । शारदियेचे
नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।
आविष्करोनी महामती । व्यासाचिये
म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा
तेवींचि आइका आणिक एक । एथुनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधि कोवळीक । दुणावली
एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।
आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ
माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भले
एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।
म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले
आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ
भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।
तैसे व्यासमती कवळले । अवघे विश्व
कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।
तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात
ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे ।
तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी
ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे ।
आदिलापासोनि अपाडे । जियापरी
नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।
मग अलंकाती बरवेपण । निवाडु दावी
तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले ।
ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी ।
पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली
म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं ।
येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय
ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया
जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो
आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी
ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि ।
निवडिले निरवधि । नवनीत हे
मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके ।
पद आले परिपाकें । आमोदासी
जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ
जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल
जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे।
जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं
जैसे शारदियेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे ।
तें वेंचती मवाळें । चकोरतलगें
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अति हळुवारपणे चित्ता । आणूनियां
हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये
का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे
आथिला तोचि जाणे । मानूं इये
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।
तिहीं कृपा करून संतीं । अवधान द्यावे
हे सलगीं म्यां म्हणितले । चरणां लागोनि विनविलें ।
प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।
तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी
तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला ।
तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी
परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थ कवळुं पाहें ।
ते अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां
हे अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।
येर्हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी
का टिटिभू चांचूवरी । माप सूये सागरी ।
मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ
आइका आकाश गिंवसावे । तरी त्याहूनि थोर होआवें ।
म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारिता
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।
जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी
तेथ हरू म्हणे नेणिजे । देवी जैसें का स्वरूप तुझें ।
तैसें नित्यनूतन देखिजे । गीतातत्व
हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू ।
तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला
ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद । काय होय
हें अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे ।
गगन मुठीं सुवावे । मशके केवीं
परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु ।
जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे
येर्हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु ।
तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे ।
की मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धी
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकया आथी भारती ।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कायी
जयातें कामधेनू माये । तयासी अप्राप्य काही आहे ।
म्हणऊनि मी प्रवर्तों लाहे । ग्रंथी इये
तरी न्यून ते पुरतें । अधिक ते सरते ।
करून घ्यावे हें तुमते । विनवीतु असे
आता देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।
जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरोपितु ।
ते आपुला अलंकारितु । भलतयापरी
तंव श्रीगुरू म्हणती राहीं । हे तुज बोलावे न लगे कांही ।
आता ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगा
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु ।
म्हणे परियेसा मना अवकाशु । देऊनियां
तरी पुत्रस्नेहे मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ॥
म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे ।
गेले असती व्याजें । झुंजाचेनि
तरी तिहीं येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं ।
तें झडकरी कथन करी । मजप्रती
तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचलले ।
जैसें महाप्रळयीं पसरले । कृतांतमुख
तैसे तें घनदाट । उठावले एकवाट ।
जैसें उसळले कालकूट । धरीं कणव
ना तरी वडवानलु सादुकला । प्रलयवाते पोखला ।
सागर शोषूनि उधवला । अंबरासी
तैसे दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर ।
अवगमले भयासुर । तिये काळीं
तें देखिलेयां दुर्योधनें । अव्हेरिले कवणे माने ।
जैसें न गणिजे पंचाननें । गजवटांते
मग द्रोणापासी आला । तयाते म्हणे हा देखिला ।
कैसा दळभारु उचलला । पांडवांचा
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह संभवते ।
हे रचिले आथि बुद्धिमंते । द्रुपद्कुमरें
जो का तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनी कुरुठा केला ।
तेणे हा पाखरिला । देखदेख
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।
जे क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती
जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे ।
ते सांगेन कौतुकें । प्रसंगेचि
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु ।
महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु
युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
चेकितान धृष्टकेतु । काशिश्वरु विक्रांतु ।
उत्तमौज नृपनाथु । शैब्य देख
हा कुंतिभोजु पाहे । एथ युधामन्यु आला आहे ।
आणि पुरुजितादि राय हे । सकळ देखे
हा सुभद्रहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु ।
तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखे द्रोणा
आणिकही द्रौपदीकुमर । के सकळही महारथी वीर ।
मिती नेणिजे अपार । मीनले आथि
आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक ।
ते प्रसंगे आइक । सांगिजती
उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी ।
तुम्हीआदिकरूनि । मुख्य जे जे
हा भीष्मु गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानू ।
रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु
या एकेकाचेनि मनोव्यापारें । हे विश्व होय संहरे ।
हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें ।
याचा अडदरु सदा वाहे । कृतांतु मनीं
समितिंजयो सोमदत्ति । ऐसे आणिकही बहुत आहाती ॥
जयाचिया बळा मिती । धाताही नेणे
जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।
हो कां जे अस्त्रजात । एथूनि रूढ
हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगी ।
परी सर्व प्राणें मजचिलागी । आराइले असती
पतिव्रतेचे हृदय जैसे । पतीवांचूनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी
आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।
ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त
झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती ।
हे बहु असो क्षात्रनीती । एथोनियां
ऐसें सर्वापरी पुरते । वीर दळी आमुतें ।
आतां काय गणूं यांतें । अपार हे
वरी क्षत्रीयांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी गा सुभटु ।
तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं
आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसे पन्नासीलें ।
येणे पाडे थेंकुले । लोकत्रय
आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपणा कवणा नाहीं ॥
मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा
ना तरी प्रलयवह्नि महावातु । या दोघां जैसा सांघातु ।
तैसा हा गंगासुतु । सेनापति
आतां येणेंसि कवण भिडे । हे पांडव सैन्य कीर थोडें ।
ओइचलेनि पाडे । दिसत असे
वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।
ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली असे
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांते म्हणितलें ।
आता दळभार आपुलाले । सरसे करा
जिया जिया अक्षौहिणी । तिये तिये आरणी ।
वरगण कवणकवणी । महारथिया
तेणे तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे ।
द्रोणाते म्हणिजे । तुम्हीं सकळ
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।
येणें दळभारु आघवा । साचु आमुचा
या राजाचिया बोला । सेनापति संतोषला।
मग तेणे केला । सिंहनादु
तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्यांआंतु ।
प्रतिध्वनि न समातु । उपजत असे
तयाचि तुलगासवे । वीरवृत्तिचेनि थावें ।
दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला
ते दोन्ही नाद मिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें ।
जैसें आकाश कां पडिलें । तुटोनियां
घडघडीत अंबर । उचंबळत सागर ।
क्षोभलें चराचर । कांपत असे
तेणें महाघोषगजरें । दुमदुमताती गिरिकंदरें ।
तंव दलामाजि रणतुरें । आस्फारिलीं
उदंड सैंघ वाजतें । भयानकें खाखाते ।
महाप्रळयो जेथें । धाकडांसी
भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ ।
आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे
आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती ।
जेथ महामद भद्रजाती । आवरती ना
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।
जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे
एकां उभयतांचे प्राण गेले । चांगांचे दांत बैसले ।
बिरुदांचे दादुले । हिंवताती
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।
देव म्हणती प्रळयकाळु । ओढवला आजि
ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु ।
तंव पांडवदळा आंतु । वर्तलें कायी
हो कां निजसार विजयाचे । कीं ते भांडार महातेजाचे ।
जेथ गरुडाचिचे जावळिये । कांतले चार्ही
की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवितसे तैसा ।
तेजें कोंदटलिया दिशा जयाचेनि
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण ।
तया रथाचे गुण । काय वर्णूं
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु ।
सारथी शारङधरु । अर्जुनेसीं
देखा नवल तया प्रभूचें । प्रेम अद्भुत भक्तांचे ।
जे सारथ्य पार्थाचें । करीतु असे
पाईकु पाठीसीं घातला । आपण पुढां राहिला ।
तेणें पांचजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि
परी तो महाघोषु थोरु । गाजत असे गंहिरु ।
जैसा उदैला लोपि दिनकरु । नक्षत्रांते
तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळी गाजत होते ।
ते हारपोनि नेणों केऊते । गेले तेथ
तैसाचि देखे येरें । निनादें अति गंहिरे ।
देवदत्त धनुर्धरे । आस्फुरिला
ते दोनी शब्द अचाट । मिनले एकवट ।
तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे
तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला ।
तेणें पौंड्र आस्फुरिला । महाशंखु
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गंहिरु ।
तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे
नकुळें सुघोषु । सहदेवे मणिपुष्पकु ।
जेणें नादें अतंकु । गजबजला असे
तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक ।
हा काशीपती देख । महाबाहु
तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।
दृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।
तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले
तेणें महाघोषनिर्घातें । शेषकूर्म अवचिते ।
गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती
तेथ तिन्हीं लोक डंडळित । मेरु मांदार आंदोळित ।
समुद्रजळ उसळत । कैलासवेरी
पृथ्वीतळ उलथों पाहत । आकाश असे आसुडत ।
तेथ सडा होत । नक्षत्रांचा
सृष्टि गेली रे गेली ॥ देवां मोकळवादी जाहली ।
ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं । १५७ ॥
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला ।
तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं
तंव आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु ।
मग लोपला अद्भुतु । संभ्रमु तो
म्हणोनि विश्व सांवरले । एर्हवीं युगांत होतें वोडवले ।
जै महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं
तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला ॥
तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा
तो जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु ।
तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया
तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।
एकमेकांते म्हणती । सावध रे सावध
तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते ।
तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें
मग सरिसपणें उठावले । दुणावटोनि उचलले ।
तया दंडी क्षोभलें । लोकत्रय
तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर ।
जैसे प्रलयांत जलधर । अनिवार का
तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मने ।
मग संभ्रमे दिठी सेने । घालितसे
तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले ।
मग लीला धनुष्य उचलिले । पंडुकुमरें
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच - सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ २१।
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा ।
नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां
जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक ।
न्याहळीन अशेख । झुंजते जे
एथ आले असती आघवे । परी कवणेंसी म्यां झुंजावे ।
हे रणीं लागे पहावें । म्हणऊनियां
बहुतकरुनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव ।
वाटिवांवीण हांव । बांधिती झुंजीं
आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला ।
दोहीं सैन्यामाजि केला । उभा तेणें
जेथ भीष्माद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख ।
पृथिविपति आणिक । बहुत आहाति
तेथ स्थिर करूनि रथु । अर्जुन असे पाहतु ।
तो दळभार समस्तु । संभ्रमेसी
मग देवा म्हणे देख देख । हे गोत्रगुरु अशेख ।
तंव कृष्णा मनीं नावेक । विस्मो जाहला
तो आपणयां आपण म्हणे । एथ कायि कवण जाणे ।
हें मनीं धरिले येणें । परि कांही आश्चर्य असे
ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणे हृदयस्थु ।
परि उगा असे निवांतु । तिये वेळीं
तंव तेथ पार्थु सकळ । पितृपितामह केवळ ।
गुरू बंधु मातुळ । देखता जाहला
इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले ।
हे सकळ असती आले । तयांमाजि
सुहृज्जन सासरे । आणिकही सखे सोईरे ।
कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ
जयां उपकार होते केले । कां आपदीं जे राखिले ।
हे असो वडील धाकुले - । आदिकरुनि
ऐसे गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं ।
हें अर्जुने तिये वेळीं । अवलोकिलें
कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्नमब्रवीत ।
तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली ।
तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी ।
तिया आणिकींते न साहति । सुतेजपणें
नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे ।
मग पाडेंविण अनुसरें । भ्रमला जैसा
कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ।
मग तया विरक्ततासिद्धी । आठवेना
तैसें अर्जुना तेथ जाहले । असतें पुरुषत्व गेले ।
जें अंतःकरण दिधले । कारुण्यासी
देखा मंत्रज्ञु बरळु जाये । मग तेथ कां जैसा संचारु होये ।
तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला
म्हणऊनि असता धीरु गेला । हृदया द्रावो आला ।
जैसा चंद्रकळीं सिंपिला । सोमकांतु
तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु ।
मग सखेद असे बोलतु । अच्युतेसी
तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा ।
तंव गोत्रवर्गु आघवा । देखिला एथ
हे संग्रामीं अति उद्यत । जाहाले असती कीर समस्त ।
पण आपणपेयां उचित । केवीं होय
येणें नांवेंचिं नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं ।
मन बुद्धी ठायीं । स्थिर नोहे
देखें देह कांपत । तोंड असे कोरडें होत ।
विकळता उपजत । गात्रांसी
सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळे हातु गेला । गांडीवाचा
तें न धरताचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिले ।
ऐसे हृदय असे व्यापिलें । मोहें येणें
जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण ।
तयाहून असाधारण । हें स्नेह नवल
जेणे संग्रामी हरू जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला ।
तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजि
जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें ।
परि कळिकेमाजीं सापडें । कोवळियें
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परीं ते कमळदळु चिरूं नेणे ।
तैसे कठीण कोवळेंपणे । स्नेह देखा
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया ।
म्हणऊनी भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे
अवधारीं मग तो अर्जुनु ।देखोनि सकळ स्वजनु ।
विसरला अभिमानु । संग्रामींचा
कैसी नेणों सदयता । उपनली येथे चित्ता ।
मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ
माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ ।
जे वधावे हे सकळ । येणें नांवे
या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठिरादिक कां न वधावे ।
हे येर येर आघवे । गोत्रज आमुचे
म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज ।
एणें काय काज । महापापें
देवा बहुतं परीं पाहता । एथ वोखटें होईल झुंजतां ।
वर काहीं चुकवितां । लाभु आथी
तया विजयवृत्ती कांही । मज सर्वथा काज नाहीं ।
एथ राज्य तरी कायी । हें पाहुनियां
यां सकळांते वधावे । मग जे भोग भोगावे ।
ते जळोत आघवे । पार्थु म्हणे
तेणें सुखेविण होईल । तै भलतेही साहिजेल ।
वरि जीवितही वेंचिजेल । याचिलागीं
परीं यासी घातु कीजे । मग आपण राज्य भोगिजे ।
हे स्वप्नींही मन माझे । करूं न शके
तरी आम्ही का जन्मावें । कवणालागीं जियावें ।
जें वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें
पुत्रातें इप्सी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ ।
जे निर्दाळिजे केवळ । गोत्र आपुले
हें मनींचि केवि धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे ।
वरी घडे तरी कीजे । भले एयां
आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें ।
हे जीवितही उपकारावें । काजीं यांचां
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ ।
मग संतोषविजे कुळ । आपुलें जें
तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत ।
जे जाहले असती उद्यत । झुंजावया
अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें ।
शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी
ऐसियांते कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं ।
निज हृदया करूं । घातु केवीं
हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण ।
जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत
एथ शालक सासरे मातुळ । आणी बंधु कीं हें सकळ ।
पुत्र नातू केवळ । इष्टही असती
अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे ।
म्हणोनि दोष आथि वाचे । बोलतांचि
हे वरी भलतें करितु । आंताचि एथें मारितु ।
परि आपण मनें घातु । न चिंतावा
त्रैलोक्यींचे अनकळित । जरी राज्य होईल एथ ।
तरी हें अनुचित । नाचरें मी
जरी आज एथ ऐसें कीजे । तरी कवणांचा मनीं उरिजे ।
सांग मुख केवीं पाहिजे । तुझे कृष्णा
जरी वधु करूनी गोत्रजांचा । तरी वसौटा होऊन दोषांचा ।
मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी
कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें ।
तयें वेळी तूं कवण कें । देखावासी
जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु ।
मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे
सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु ।
न सेवितु अव्हेरु । करूनि निघे
तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा ।
जरी पुण्याचा वोलावा । नाशिजेल
म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं ।
हें किडाळ बहुतीं । परीं दिसतसे
तुझा अंतराय होईल । मग सांगें आमचें काय उरेल ।
तेणें दुःखे हियें फुटेल । तुजवीण कृष्णा
म्हणावूनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती ।
हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे
हे अभिमानपदे भुलले । जरी पां संग्रामा आले ।
तर्ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे
हें ऐसें कैसें करावें । जे आपुले आपण मारावे ।
जाणत जाणतांचि सेवावें । कालकूट
हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंह जाहला अवचितां ।
तो तंव चुकवितां । लाभु आथी
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा ।
तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे
का समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी ।
तरी क्षणा एका कवळूनि । जांळू सके
तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात ।
हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें
ऐसें पार्थ तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं ।
या कल्मषाची थोरी । सांगेन तुज
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । येथ वन्हि एक उपजे ।
तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि
तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें ।
तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे
म्हणवूनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे ।
मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजि
एथ सारासार विचारावें । कवणे काय आचरावें ।
आणि विधिनिषेध अघवे । पारुषति
असता दीपु दवडीजे । मग अंधकारीं राहाटिजे ।
जे उजूंचि का आडळिजे । जयापरी
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळी तो आद्य धर्मु जाय ।
मग आन कांहीं आहे । पापांवाचुनि
जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रियें सैरा विचरती ।
म्हणवूनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी
उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती ।
तेथ समूळ उपडती । जातिधर्म
जैसी चोहटाचिया बळी । पाविजे सैरा काऊळीं ।
तैसीं महापापें कुळीं प्रवेशती
मग कुळा देखा अशेखा । आंणि कुळघातका ।
येरयेरा नरक । जाणें आथी
देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित ।
मग मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक पारुखे ।
तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी
तरी पितर काय करिती । कैसेनि स्वर्गीं बसती ।
म्हणोनि तेही येती । कुळापासी
जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें ।
तेवी आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे
देवा अवधारी आणिक एक । एथ घडे महापातक ।
जै संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे
जैसा घरीं आपुला । वानिवसे वन्ही लागला।
तो आणिकांही प्रज्वळिला । जाळुनि घाली
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती ।
तेही बाधु पावती । निमित्तें येणें
तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ ।
मग महाघोर केवळ । निरय भोगी
पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतीही उगंडु नाही ।
येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे
देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे ।
हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक ।
ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना
हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले ।
सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवे ।
जे शस्त्र सांडूनि साहावे । बाण त्यांचे
तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें ।
परी येणें कल्मषें । चाड नाहीं
ऐसें देखोनि सकळ । अर्जुनें आपुलें कुळ ।
मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु
ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं ।
संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्रातें
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरू आला ।
तेथ उडी घातली खालां । रथौनियां
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहृतु ।
कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु
ना तरी महासिद्धीसंभ्रमें । जिंतला त्रासु भ्रमे ।
मग आकळुनि कामें । दीनु कीजे
तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दुःखें जर्जरु ।
दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें
मग धनुष्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले ।
ऐसें ऐके राया तेथ वर्तलें । संजयो म्हणे
आता यावरी तो वैकुंठ्नाथु । देखोनि सखेद पार्थु ।
कवणेपरी परमार्थु । निरुपील
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां ।
ज्ञानदेव म्हणे आतां निवृत्तिदासु
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0